अवयवदान पंधरवडा निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जनजागृती

सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने अवयवदान पंधरवडा या उपक्रमाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील उपस्थित शिकावू चालक उमेदवार तसेच उपस्थित कर्मचारी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच अवयवदान या संबंधीची माहिती देवून जनजागृती करण्यांत आली. तसेच उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यांत आली. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक वाहन निरिक्षक पराग मातोंडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवम शिवरकर तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे समाजसेवा अधिक्षक सुनिल कुंडगिर आदी उपस्थित होते. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'