सहकारी संस्थांना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी दि. 1 (जिमाका) :- जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सहकार पुरस्कार सन 2023-24 साठीचे प्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्ती जास्त सहकारी संस्थानी सहकार पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी केले आहे.
ज्या सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे असतील त्यांनी ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे. त्या तालुक्यातील तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे दिनांक 18 ऑगस्ट 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. गट नियम , प्रकार निहाय किमान 10 संस्थांचे प्रस्ताव आवश्यक आहे. संस्थेचा प्रस्ताव सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण आसावीत. अपूर्ण कागदपत्रे असल्यास ती तात्काळ पूणे करुन घेण्यासाठी संबंधितांना मार्गदर्शन करण्यात येईल. 18 ऑगस्ट नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.
सदरचे प्रस्ताव तालुका कार्यालयांकडून छाननी करुन परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्याची मुदत दि. 19 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. त्यांनतर वरीष्ठ कार्यालयास परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment