वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉलसाठी निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाव्दारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (15 वर्षाखालील मुले आणि मुली) चॅम्पियनशिप दि. 4 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत चीनमधील शांग्लुओ येथे होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे खेळाडू सहभागी होण्यासाठी माहे ऑगस्ट 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात राज्य निवड चाचणी पुणे येथे आयोजित केलेली आहे.तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी व्हॉलीबॉल निवड चाचणीत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून, भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघाकडून राष्ट्रीय निवड चाचणीचे दि. 25 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा या कार्यालयास या चाचण्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दि. 11 ऑगस्ट रोजी सायं.5 वाजेपर्यंत उपस्थिती रहावे, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निवड चाचणी होईल. ठिकाण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा .
निवड चाचणीसाठी पात्रता/निकष :-
खेळाडूचा जन्म दि. 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर झालेला असावा, दि. 1 जानेवारी 2010 पुर्वी तसेच 1 जानेवारी 2014 व त्या नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीसाठी पात्र असणार नाहीत.
निवड चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
शासकीय विभागाने वितरीत केलेला मूळ जन्म दाखला (इंग्रजी मधील) सादर करणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय चाचणी वेळी किमान 6 महिने व्हॅलीडीटी शिल्लक असलेला भारतीय पासपोर्ट असणे अनिवार्य राहील. तसेच विभागीय चाचणी वेळी पासपोर्ट विभागाकडे तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठीचा अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.
0000
Comments
Post a Comment