भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येत आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Deparment of Sainik Welfare, pune (DSW)यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-62 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. या एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईट डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC)अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेश (NDA- UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेडमध्ये पास झालेले आसावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेंटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme)साठी एसएबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctenashik@gmail व दूरध्वनी क्र. 0253 2451032 किंवा व्हाट्सॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'