जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर
सिंधुदुर्गनगरी दिनांक 6 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याद्वारा जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ऑगस्ट रोजी पार पाडल्या.
या स्पर्धेकरिता संपुर्ण जिल्ह्यातून 145 खेळाडुंनी उपस्थिती दर्शविली, जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन यांनी केले.
जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
14 वर्षाखालील मुले - प्रथम - श्री. कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर
व्दितीय - उर्दु माध्यमिक विद्यालय, उंबर्डे -कोळपे
तृतीय - क.म.शि.प्र मंडळाची इंग्लिश मेडियम सेंकडरी स्कूल, कुडाळ
14 वर्षाखालील मुली- प्रथम - श्री. कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर
व्दितीय - जयगणेश इंग्लिश मेडियम स्कूल, मालवण
तृतीय - श्री माधवराव पवार विद्यालय, कोकीसरे
17 वर्षाखालील मुले- प्रथम - क.म.शि.प्र मंडळाची इंग्लिश मेडियम सेंकडरी स्कूल, कुडाळ
व्दितीय - श्री. कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर
तृतीय - उर्दु माध्यमिक विद्यालय, उंबर्डे -कोळपे
17 वर्षाखालील मुली -प्रथम - श्री. कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर
व्दितीय - जयगणेश इंग्लिश मेडियम स्कूल, मालवण
तृतीय - सरस्वती हायस्कुल, नांदगाव
19 वर्षाखालील मुले -प्रथम - अर्जुन रावराणे विद्यालय आणि कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज, वैभववाडी
व्दितीय - कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , कुडाळ
तृतीय - राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
19 वर्षाखालील मुली -प्रथम - श्री कलेश्वर विद्यामंदिर , नेरूर
व्दितीय - कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , कुडाळ
तृतीय - राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे.
000000
Comments
Post a Comment