इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.१४ (जि.मा.का):- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक- युवतींना इस्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. पहिल्या टप्यात सुमारे ५,००० युवक, युवतींना संधी मिळणार आहे, याकरीता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक युवतींनी https://maharashtraintemational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे सिंधुदुर्ग यांनी केले आहे. होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स सेवेसाठी निपूण, पारंगत भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून २५ ते ४५ वर्षे वयोगटाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी मासिक वेतन रु. १ लाख ६१ पर्यंत असेल. इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच होणार असून नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हीजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. इस्राईलमध्ये राहण्याची व जेवणाची सोय, मेडीकल विमा, इतर मेडीकल सुविधा दिल्या जाणार आहेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'