शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनांसाठी 12 वी नंतरचे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (बी.ए,बी.कॉम, बी.एस.सी.अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए.,एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता दि. 27 ऑगस्ट 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इतर मगास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी दिली आहे. इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनांचे अर्ज अद्यापही भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरुन त्यांची प्रत संबंधित वसतीगृहात, कार्यालयात जमा करावी. अधिक माहितीसाठी इतर मागास बहुज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ओरोस, इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह कणकवली येथे संपर्क साधावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'