इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 1 (जिमाका) : राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणे योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, (बांधकरवाडी) कणकवली येथे सुरु झाले आहे. या वसतीगृहात सन २०२५-२६ साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा दर्शविणारे विवरणपत्र खालील प्रमाणे. अ.क्र प्रवर्ग एकुण आरक्षण व्यवसायिक अभ्यासक्रम बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम 1 इतर मागास वर्ग ३१% २२ ९ 2 विमुक्त जाती व भटक्या जमाती २०% १४ ६ 3 विशेष मागास प्रवर्ग ४% ३ १ 4 दिव्यांग २% १ १ 5 अनाथ १% १ ० 6 आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) २% १ १ एकुण ६० ४२ १८ वसतीगृह प्रवेशाकरीता नियम व अटी- विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशष मागासप्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला), या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे, उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये गुणवत्तेनूसार तसेच, संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानूसार प्रवेश देण्यात येईल. याकरीता इयत्ता १२ वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. सन २०२५-२६ करीता अटी व निकष पुर्ण करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बीए/बीकॉम/बी.एस.सी. अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्याक्रम मध्ये शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.१७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, (बांधकरवाडी) कणकवली यांच्याकडे जमा करावयाची आहे. या वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उदयसिंह गायकवाड, यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'