नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरु

सिंधुदुर्गनगरी दि 28 (जिमाका):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु करण्यात आली असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी दिली आहे. गृहोपयोगी संच प्राप्त करुन घेण्यासाठी बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने https://hikit.mahabocw.in/appointment या लिंकवर जाऊन अपॉईंटमेंट घेताना वितरण केंद्र निश्चित करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राची वितरण क्षमता 500 इतकी असेल, वितरण दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत (शासकीय सुट्या) वगळून खेले ठेवण्यात आलेले आहे, आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल. गृहोपयोगी संच हे पूर्णपणे विनामूल्य देण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'