राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १ (जिमाका) : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी AIIMS, IIM, IIIT, NIT, IISC, IISER व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे यांनी दिली. राज्यातील १०० अनुसूचित जाती , नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इ. शुल्क संबंधित विद्यापीठः शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रूपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत. या योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात अर्ज व नियमावली शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमूना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पच, पुणे येथे सादर करावा. पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त अनु.जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावयाचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'