तक्रारदारांची ऑनलाईन सभा संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या विभागांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची ऑनलाईन सभा VC व्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या दालनात संपन्न झाली, असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जयप्रकाश परब यांनी दिली आहे.
या सभेत 6 तक्रारदार ऑनलाईन व्हि.सी.व्दारे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी तक्रारदारांच्या व्यथा ऐकून नियमोचित कार्यवाही करण्याचे संबंधित तक्रारदार यांना आश्वासन दिले. तसेच तक्रारदारांच्या तक्रारी ज्या विभागांशी संबंधित आहेत, त्या विभागांना तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच यापुढे होणाऱ्या तक्रार निवारण सभेचा दिनांक व वेळ जिल्ह्यात प्रसिध्द होणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात यावी अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रशासनाला दिल्या.
००००००
Comments
Post a Comment