जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे विधी सेवा केंद्राची स्थापना

सिंधुदुर्गनगरी, दि.१४ (जि.मा.का):- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरमाता-पिता व अवलंबित यांच्या न्यायालीन प्रकरणांकरीता मोफत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे "विधी सेवा केंद्राची स्थापना" करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या केंद्रामार्फत महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्याव्दारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वीर, परिवार सहायत्ता योजना २०२५ प्रमाणे संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अवलंबितांना मालमत्ता विवाद, कल्याणकारी योजना, वैवाहीक वाद, नागरी वाद आणि इतर कायदेशीर बाबीमध्ये मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा आणि मदत प्रदान करण्यासाठी केंद्रीय, राज्य आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये विधी सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना न्यायालयीन प्रक्रियेबाबत योग्य माहिती मिळेल व कायदेशीर अडचणींचे निराकरण होण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपुर्णा गुंड्डेवाडी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती पोवार, आरती देसाई, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर,पॅनल विधीज्ञ ॲङ आशपाक शेख, ॲङ रुपेश परुळेकर, तसेच विधी स्वयंसेवक पल्लवी जाधव, जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णु ताम्हणेकर,सैनिक कल्याण कार्यालयाचे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी तसेच विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच माजी सैनिक आदी उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'