सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सुरु
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट 2022 करिता मंजूर असलेल्या SEWING TECHNOLOGY, CARPENTER,COPA, ELECTRICIAN, MECHANIC MOTOR VAHICLE, FITTER TURNER, WIREMAN , ICTSM या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आली आहे.
अर्ज भरल्यावर स्वत: पूर्णपणे माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री झाल्यावर प्रवेश शुल्क ऑनलाईन पध्दीने Gateway च्या माध्यमातून भरणा करावा. अर्ज शुल्क राखीव उमेदवारासाठी 100 रुपये शुल्क, अराखीव उमेदवारासाठी 150 रुपये शुल्क, महाराष्ट्राबाहेरील उमेदवारसाठी 300 रुपये शुल्क अनिवासी भारतीय उमेदवारसाठी 500 रुपये शुल्क असे आहे. ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत पडताळणीसाठी मूळ कागदतपत्रे व झेराक्सप्रतीसही 22 जून पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यालयीन वेळेत हजर रहावे.उमेदवारांचे अर्ज तपासणी करुन अर्ज निश्चित केला जाईल. त्याबाबतची पावती दिली जाईल. उमेदवारांने आपल्या पसंतीनुसार व्यवसायनिहाय संस्थानिहाय विकल्प भरावे. इ 10वी ची गुणपत्रिका शाळांमार्फत वितरीत करण्यांत आल्यावर प्रवेशाचे वेळापत्रक घोषित केले जाईल.
प्रवेशाबाबतची माहिती सावंतवाडी तालुक्यातील गावोगावी प्रसिध्दी व्हावी याकरिता माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना त्यांच्या व्हॉट्सअप वर प्रवेशाबाबतचे माहितीपत्रक पाठविण्यांत आलेले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी, दूरध्वनी क्र. 02363 276136, 295136 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423304735,9420910912 वर संपर्क साधावा असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र.फ.पाटील, यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment