शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी, विद्यार्थीनीं, वसतिगृहातील रिक्त असलेल्या जागावर ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी मागासवर्गीय विद्यार्थी ,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, दूरध्वनी क्र.02362-228882 ) या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी शालेय विद्यार्थीसाठी दि. 15 जूलै 2022 पर्यंत. इयत्ता 11 वी व 10 वी नंतरचे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) साठी दि. 30 जूलै 2022 पर्यंत. बी.ए. / बी.कॉम / बी.एस.सी. 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम.ए. / एम.कॉम./ एम.एस.सी. पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी / पदविका इ. अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) साठी दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत. व्यावसायिक अभ्यासक्रम साठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करात येतील.
सिंधुदुर्ग जिल्हयातील शासकीय वसतिगृहे खालील ठिकाणी आहेत.
सन 2022-23 प्रवेशासाठी रिक्त असणाऱ्या जागा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण 02365-251323 रिक्त असणाऱ्या जागा 48 आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कणकवली 02367-231321 रिक्त असणाऱ्या जागा- 38 आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला संपर्क क्रमांक 02366-262435 रिक्त असणाऱ्या जागा- 61 आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण संपर्क क्रमांक-02365-251803, रिक्त असणाऱ्या जागा-39 आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कणकवली संपर्क क्रमांक 02367-230454, रिक्त असणाऱ्या जागा-43 आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावंतवाडी संपर्क क्रमांक -02363-273097, रिक्त असणाऱ्या जागा-40 आहेत. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, देवगड संपर्क क्रमांक - 02364-262170, रिक्त असणाऱ्या जागा- 90 आहेत. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला संपर्क क्रमांक- 02366-262534, रिक्त असणाऱ्या जागा-83 आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने अर्ज सबंधित वसतिगृहांकडून विनामूल्य उपलब्ध करुन परिपूर्ण भरून व सर्व कागदपत्रासहित वसतिगृहात सादर करावे, असे आवाहन श्री.साळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केलेले आहे.
0000
--
Comments
Post a Comment