पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि 22 जून 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 22 जून 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कै.श्रीधर नाईक 31 वा स्मृतीदिन निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ. कै.श्रीधर नाईक चौक,कणकवली सिंधुदुर्ग. सकाळी 11 वाजता, कै.श्रीधर नाईक उद्यान नुतनीकरण उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11. 30 वाजता कणकवली येथून मोटारीने गोवा कडे प्रयाण.
0000
Comments
Post a Comment