पदक विजेत्या खेळाडूंना आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर पदकविजेत्या खेळाडूंची माहिती संकलित करुन कॉफी टेबल बुक प्रसिध्द करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
तरी पदकविजेत्या खेळाडूंनी आपली माहिती फोटोसह आपल्या संबंधित शाळा, महाविद्यालय, एकविध क्रीडा संघटनांकडे 15 जुलै 2022 पर्यंत सादर करावी. खेळाडूचे नाव, जन्मतारीख, स्पर्धास्तर, स्पर्धेचे नाव, प्राविण्य,सूचना- खेळाडूंची शालेय स्पर्धा, एकविध क्रीडा संघटानी संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धामधील कामगिरी विचारत घ्यावी. भारतीय ऑलम्पिक महासंघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व्दारा मान्यता प्राप्त खेळांमधील कामिगिरी विचारात घ्यावी. अशी माहिती ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment