डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत असलेल्या अल्पसंख्यांक विकास विभाग यांचेकडून डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावित, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन 2022-23 या वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांचेमार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडे 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावीत. विहित अर्जाचा नमुना याबाबत अधिक माहिती www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही.
00000
Comments
Post a Comment