सिंधुदुर्गनगरी येथे 27 रोजी डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग येथे दिनाक 27 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजित केलेली आहे.
पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारत घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. जी. जनार्दन रेड्डी, अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे नावे दिनांक 20 जून 2022 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. अशी माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग यांनी प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment