न्यायीक प्रकरणाचा निपटरा करण्यासाठी विशेष मोहिम
सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का): सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. राज्य न्यायालय व्यवस्थापन प्रणाली समितीने जून 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत न्यायिक प्रकरारणांचा निपटारा करण्यासठी विशेष मोहिम जाहीर केले असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त एम.एस. नियम यांनी दिली.
या मोहिमेमध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 5 व 10 वर्ष कालावधीतील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात येणार आहे. प्रलंबित न्यायीक बोर्डावर नेमण्यात आलेली प्रकरणाची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व विश्वस्त, वकीलाना आवाहन करण्यात येते की, संस्था न्यासांची न्यायिक जूनी प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावे.
0000
Comments
Post a Comment