जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकासाठी कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 जल जीवन मिशन अंतर्गत कामाना गती देण्याकरिता दिनांक 23 व 24 जून रोजी सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील व सल्लागार युनिसेफ मुंबईचे मंदार साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहवे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या कामांना गती देण्याकरिता देवगड, वैभववाडी, कणकवली व मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे दि.23 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता या कालावधीत कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे.सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी सावतवाडी येथील भगवती मंगल कार्यालय मळगाव येथे दिनांक 24 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी तांत्रिक व प्रशासकीय माहिती, मंदार साठे उपस्थित सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना देणार आहेत. ग्रामपंचयात कार्यक्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या अडचणी बाबत सरपंच ग्रामसेवक यांच्याशी थेट संवाद करण्यात येणार आहे. तर जल मिशन अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांची भूमिका व जबाबदारी याबाबत पाटोदा माजी सरपंच भास्कर पेरे पाटील हे मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत उपस्थिताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहवे असे आवाहन ही श्री. ठाकूर यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'