जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.)- जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन येत आहे. उद्या रविवार दि. 26 जून जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज यांच्या संयुक्तपणे जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरुणांना नशेच्या पदार्थांपासून लांब ठेवण्यासाठी नशेच्या विरोधात प्रतीबंधात्मक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि. 26 जून रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे सकाळी 9 ते 11 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेदहाच्या दरम्यान कणकवली कॉलेज ते आप्पा पटवर्धन चौक जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत जास्तीत जास्त जनतेनी सहभाग घ्यावा असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'