जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाव्दारे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा दि. 14 व 15 जुलै 2022 रोजी श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, मागणाव येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. 17 वर्षे मुले यांच्यासाठी दि.14 जुलै 2022 रोजी सकाळी 9. वाजता उपस्थित राहवे. 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुली यांच्यासाठी दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहवे.
0000
Comments
Post a Comment