पोलीस विभागाकडून 12 जूलै पर्यंत नियमन आदेश
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्थी गट आपआपल्या कार्यकत्यांची जमवाजमव करुन एकमेका लक्ष करीत आहे. काही ठिकाणी आंदोजनात्मक घटना घडलेल्या आहेत. तसेच 10 जूलै 2022 रोजी देवशयनी आषाढी एकादशी व बकरी ईद साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दि. 28 जून 2022 ते 12 जूलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे नियमन आदेश पदभार पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहे.
आदेश म्हटले आहे की ,राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्त राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्थी गट आपआपल्या कार्यकत्यांची जमवाजमव करून एकमेकां लक्ष करीत असुन त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी वैयक्तीक हेवेदावेंच्या कारणाकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक 10 जूलै 2022 रोजी देवशयनी आषाढी एकादशी व बकरी ईद साजरी होणार आहे.
जिल्ह्यातील राजकिय परिस्थिती पाहता कोणताही अनुचित प्रकार न होता सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजामध्ये सामाजिक शांतता परस्पर सामंजस्याची भावना वाढीस लागून सामाजिक एकात्मता अबाधित रहावी यासाठी 28 जून 2022 ते दिनांक 12 जूलै 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे नियमन आदेश जारी करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी मी नितीन बगाटे अपर पोलीस अधीक्षक, पदभार पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये मिळालेल्या अधिकारान्वये खालील प्रमाणे नियमन आदेश जारी करीत आहे. दिनांक 28 जून 2022 रोजी 12.वा ते 12 जूलै 2022 रोजी 24. वा पर्यंत सिधुदुर्ग जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यावरील सर्व पोलीस अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम 'अ' ते 'फ' प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोडी आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत आहेत
अ) रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणूक किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणुक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे.
ब) अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे.
क) सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे.
ड) सर्व रस्त्यांवर व रस्त्यांमध्ये घाटांत किंवा घाटांवर सर्व धक्यांवर व धक्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या,
कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे.
इ) कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
इ.(अ) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा (लाऊड स्पिकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
फ) सक्षम प्राधिकाऱ्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची कलमे 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
वरील प्रमाणे अधिकार प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील, आदेश पाळणार नाहीत, विरोध करील किंवा त्याचे पालन करण्यास कसुर करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहोल.
0000
Comments
Post a Comment