जिल्ह्यात दरड साक्षरता उपक्रम सोमवारी सावंतवाडी तर मंगळवारी कुडाळ कणकवली उपविभागासाठी

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.): पुणे विद्यापीठाचे माजी भूशास्त्र विभाग प्रमुख तथा भूस्खलन समिती महाराष्ट्र शासन सदस्य डॉ. सतीश ठिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून जिल्ह्यात दरड साक्षरता उपक्रम राबविला जात आहे. आज कुडाळ येथे नाथ पै महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आणि पोलीस विभागासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात दरड साक्षरता उपक्रम आज झाला. सोमवारी सावंतवाडी उपविभागासाठी सावंतवाडी येथील रविंद्र मंगल कार्यालय तसेच मंगळवारी सकाळच्या सत्रात कुडाळ उपविभागासाठी कुडाळ येथील सिध्दीविनायक हॉल तर दुपारच्या सत्रात कणकवली उपविभागासाठी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'