आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिवस साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व न्यू इंग्लिश स्कुल ओरोस सिंधुदुर्गनगरी यांचे संयुक्त विद्यमाने दि.23 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस न्यू इंग्लिश स्कुल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्या शिरस ,प्र.मुख्याध्यापक अनंत साईल, जलतरण खेळाडू, श्रावणी पालव व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. श्रीमती शिरस म्हणाल्या हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणुन साजरा केला जातो, असे प्रतिपादन केले. यंदाच्या वर्षीची ऑलिम्पिक दिनाची थिम Together for a Peaceful World म्हणजेच " शांततापूर्ण जगासाठी, एकत्र" अशी आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश खेळाचे महत्व वाढविणे, खेळ जीवनाला नविन आकार देऊ शकतो हे सांगणे असा आहे. 23 जून 1894 रोजी आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे आयोजन, प्रमोशन आणि नियोजन करण्यासाठी 1984 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे उद्देश वय,लिंग, वंश किंवा धर्म याचा भेदभाव न करता जगातील खेळ व लोकांच्या सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे.या निमित्त वेगवेगळया खेळांचे आयोजन केले जाते. जिल्हयामधील सर्व शाळां मध्ये खेळाचे प्रशिक्षक तयार करून जिल्हयातील मुलांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच वेट लिफ्टींग, पॉवर लिफ्टिंग, बॉक्सिंग, मल्लखां, जिमनॅस्टिक इ. खेळाचे आयोजन व नियोजन, प्रमोशन करण्याचे उद्दीष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना TOKYO 2020 मधील भारतीय पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत माहिती देऊन व्हीडीओ क्लिप दाखविण्यात आली. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'