प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 148 वी जयंती समाज कल्याण व प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक आश्रमशाळा, बोर्डवे येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, सुनिल बागुल, संतोष परुळेकर, श्रीम. चव्हाण, श्रीम. तोरसकर, श्रीम. अमरे, श्रीम. गिरी, श्रीम. रेवाळे व इतर कर्मचारी तसेच प्राथमिक आश्रमशाळा, बोर्डवे येथील मुख्याध्यापक आनंद कर्पे, सहा. शिक्षक श्री. पालव, श्री. नाईक, अधीक्षीका उषा गोसावी, सदानंद गोसावी (सचिव), नाथपंथी गोसावी समाज ऐक्य वर्धक मंडळ, बोर्डवे, सिंधुदुर्ग तसेच या आश्रमशाळेतील विद्यार्थी /कर्मचारी उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमास अध्यक्षांच्या हस्ते निंबध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह / प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन विद्यार्थ्यांचा सन्मान व गौरव करणेत आला. तसेच विद्यार्थ्याना इंग्रजी शब्दार्थ / इंग्रजी व्याकरण पुस्तके मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थांना देण्यात आले. त्याचबरोबर उपायुक्त प्रमोद जाधव यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत बसून शाहू महाराज यांचे विचार व स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद कर्पे तर आभार प्रदर्शन पालव यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'