टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : भारतीय डाक विभागगमार्फत या वर्षी 'ढाई आखर' राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय '2047 सालीचा भारत' हे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. स्पर्धा खुली असून 18 वर्षापर्यंत व 18 वर्षावरील अशा दोन गटात होईल. पोस्ट लिफाफा , साध्या लिफाफ्यामधून आवश्यक तिकीट लावून ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 100 शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्ती जास्त 500 शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर, आंतर्देशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा, आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस ढाई आखर राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे स्पर्धकांनी हे पत्र ,चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 40001 या पत्यावर दि. 31/10/2022 पर्यंत पाठवावीत. महाराष्ट्र मंडळ स्तरावरली निवडक पहिल्या 3 पत्रांना गटा प्रमाणे प्रथम क्र. 25 हजार रुपये. व्दितीय क्र. 10 हजार रुपये, तृतीय क्र. 5 हजार रुपये चे पारितोषिक दिले जाईल. मंडळ स्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्र राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमांकाच्या पत्राना अनुक्रमे 50 हजार रूपये, 25 हजार रुपये व 10 हजार रुपये अशी पारितोषिक दिली जातील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक जी जनार्दना रेड्डी यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'