आता शेतकरीच करणार स्वतःच्या पिकांची 7/12 ला नोंदणी 'ई पीक पाहणी' ॲपव्दारे पिकांच्या नोंदीसाठी शिबीरांचे आयोजन शेतकऱ्यांनीही लाभ घेत नोंदी करण्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रासह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत. यासाठी सजास्तरावर शिबीरे घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे. शेतकरी स्तरावरील कामाची कालमर्यादा 15 सप्टेंबर वरुन 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा. माहिती अपलोड करण्यास काही अडचण आल्यास तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. दि. 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शासनाव्दारे ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपव्दारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पीक पेरणीची माहिती भरण्यासाठी सजास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तलाठी व कृषी सहाय्यक हे प्रशिक्षक म्हणून नेमले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर कसा करावा याविषयी प्रशिक्षण देत आहेत. पूर्वी तलाठी गावामध्ये दवंडी देवून व प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी घेत असत. यानंतर संगणीकृत 7/12 वर पीक पेऱ्याच्या नोंदी करण्यात येवू लागल्या. आता बदलते स्वरूप म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापुढे याच पध्दतीने नोंदी करावयाच्या आहेत. गाव नमुना 12 अद्यावत करण्याची ही एकमेव सुविधा उपलब्ध राहणार आहे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी वारस नोंदी शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त या सर्वाचा लाभ घेवून आपल्या पिकाची नोंद आपण स्वतःच करावी आणि शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 0000000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'