वसायिक अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परिक्षा 20 ते 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा सोमवार दि. 20 ते 24 सप्टेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली. जिल्ह्यात ही परीक्षा एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, या परीक्षेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 138 इतकी आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'