पतसंस्थांच्या ठेवी व कर्जावरील व्याजदर

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) - दिनांक 25 मे 2021 रोजी झालेल्या नियामक मंडळ बैठकी मधील निर्णयाबाबत ठेवी व कर्जावरील व्याजदर सादर केली आहेत. ठेवी, तारण व विनातारणी कर्जावरील व्याजदर खालीलप्रमाणे आहेत. नागरी, ग्रामीण कर्मचारी बिगर कृषी पतसंस्थामधील ठेवीवर दयावयाचा कमाल व्याजदर 9.50 टक्के राहील. तसेच नागरी ग्रामीण,बिगर कृषी पतसंस्थामधील तारणी कर्जावरील कमाल व्याजदर 13 टक्के राहील. व नागरी,ग्रामीण,बिगर कृषी पतसंस्थामधील विनातारणी कर्जावरील कमाल व्याजदर 15 टक्के राहील. कर्मचारी बिगर कृषी पतसंस्थेचा कार्जावरील कमाल व्याजदर पुढीलप्रमाणे राहील. संस्था स्वनिधीमधून कर्जवाटप करित असल्यास कमाल व्याजदर 12 टक्के राहील. संस्था इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असल्यास अशा वित्तीय संस्थेने ज्या दराने संस्थेस कर्ज दिले आहे. त्या व्याजदराच्या 2 टक्के पेक्षा अधिक कर्जाचा कमाल व्याजदर असणार नाही. टीप - कमाल मर्यादेच्या अधिन राहुन बिगर कृषी पतसंस्थांनी त्यांचे ए.एल.आर. व ए.बी.आर. विचारात घेऊन ठेवीवरील व कर्जावरील व्याजदर ठरवावेत.तसेच व्याजदर हे 1 ऑगस्ट 2021 पासून लागु होतील.व व्याजदर हे 1 ऑगस्ट पासुन स्विकारलेल्या ठेवींना व दिलेल्या कर्जास लागु राहतील. संस्थेच्या उपविधीमध्ये काही ही नमुद असले तरी नियामक मंडळ वेळोवेळी जाहीर करेल. त्याप्रमाणे ठेवी व कर्जावरील कमाल व्याजदर सर्व बिगर कृषी पतसंस्थाना बंधनकारक राहतील. असे एम.बी.सांगळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'