मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) - केंद्र शासनाच्या स्टॅडअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता 15 टक्के मार्जिन मनी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. या योजनेकरिता इच्छूक लाभार्थीनी जिल्ह्याच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केलेले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'