कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – कोविड 19 मुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे बाल संगोपन योजना तसेच कोविडच्या अनुषंगाने पूर्ण अनाथ झालेल्या कुटुंबांना आर्थिक लाभाबाबात समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी भिकाजी काटकर, संस्था बाह्य संरक्षण अधिकारी दीपिका सावंत आदी उपस्थित होते. यावेळी एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व त्यांच्या पालकांना दत्तक बाल संगोपन, अनाथ प्रमाणपत्र, शैक्षणिक शुल्क माफी, बँक खाते यासह महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. या बालक व पालकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रसाळ यांनी केले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'