सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 22.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3536.3575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 23(3448), सावंतवाडी -44(3830.1), वेंगुर्ला - 25(2808.8) कुडाळ - 32(3419), मालवण - 33(3818.96), कणकवली - 11(3894), देवगड -02(3077), वैभववाडी - 08(3995) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment