वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 88 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43.075 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3607.8575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 53(3561), सावंतवाडी -56(3932.1), वेंगुर्ला - 18.6(2848.8) कुडाळ -38(3481), मालवण -50(3879.96), कणकवली - 30(3963), देवगड -11(3097), वैभववाडी - 88(4100) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment