क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे 4 ऑक्टोबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्ट्स कंपनी, पुणे येथील प्रवेशासाठी क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या या 8 ते 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे हे कळवितात. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'