भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व सामाजसेवा अशा 4 क्षेत्रांसाठी प्रोत्साहानात्मक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंमिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख, मानपत्र व सन्माचिन्ह असे आहे. तरी इच्छुक उमेदवार, संस्था यांनी अधिक माहितीसाठी www.bmfawards.org या वेबसाईटला भेट द्यावी अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 येथे संपर्क साधावा असे आवाहन व्ही.सी. म्हात्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'