देवगड तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 49.5 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3404.4825 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 43(3302), सावंतवाडी - 40(3636.1), वेंगुर्ला - 45(2658.8) कुडाळ - 58(3291), मालवण - 35(3670.96), कणकवली - 59(3794), देवगड - 78(3008), वैभववाडी - 38(3875) पाऊस झाला आहे.
00000

Comments
Post a Comment