मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 33(3777), सावंतवाडी - 46(4191.1), वेंगुर्ला - 37(3119.8) कुडाळ - 27(3800), मालवण - 47(4188.96), कणकवली - 07(4202), देवगड - 12(3344), वैभववाडी - 30(4412) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment