दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 28.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3564.7825 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 60(3508), सावंतवाडी - 46(3876.1), वेंगुर्ला -21.4(2830.2) कुडाळ - 24(3443), मालवण -11(3829.96), कणकवली - 39(3933), देवगड -09(3086), वैभववाडी - 17(4012) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment