10 वी व 12 वी खासगीरित्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 12 ऑक्टोंबर पर्यत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती कोकण विभागीय मंडाळाचे सचिव डॉ. शिवलींग पटवे यांनी केले. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते मंगळवार दि. 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी शुक्रवार 17 सप्टेंबर 2021 ते गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज, शुल्क जमा केल्याची पोहचपावती, दोन छायाचित्र व मूळ कागदपत्रे जवळच्या केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत. त्याचप्रमाणे केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने प्राप्त झालेले अर्ज सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज इयत्ता 10 वी साठी http://form17.mh-ssc.ac.in, व इयत्ता 12 वी साठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करुन भरण्यात यावा. इयत्ता 10 वी साठी परिक्षा शुल्क रु. 1 हजार अधिक रु. 100/- प्रक्रिया शुल्क असे एकूण 1 हजार 100/- इतके आहे. तर इयत्ता 12 वी साठी परिक्षा शुल्क रु. 500/- अधिक रु. 100/- प्रक्रिया शुल्क असे एकूण रु. 600/- एवढे भरावे लागणार आहे. ऑनलाईन अर्जाच्या अधिक माहितीसाठी 020-25705207/25705208/25705271 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'