सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3461.8575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 61(3363), सावंतवाडी - 71(3707.1), वेंगुर्ला - 65(2623.8) कुडाळ - 50(3341), मालवण - 68(3738.96), कणकवली - 48(3842), देवगड - 30(3038), वैभववाडी - 66(3941) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment