वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 39 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 39 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 19.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3627.4825 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 18(3579), सावंतवाडी -09(3941.1), वेंगुर्ला - 05(2853.8) कुडाळ -19(3500), मालवण -19(3898.96), कणकवली - 16(3979), देवगड -32(3129), वैभववाडी - 39(4139) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment