महिला वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वार घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 29 (जिमाका): राज्यातील लोकसंख्या व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहाची मागणी लक्षात घेता मुंबई उपनगर जिल्हा- 6 मुंबई शहर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 4 व राज्यातील उर्वरित 32 जिल्हयांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 50 वसतीगृहांना 100 प्रवेशित क्षमतेची इमारत भाडेतत्वार उपलब्ध करुन घेऊन नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही सुधारित योजना राबविण्यात येत आहे. शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये योजना राबविणाऱ्या संस्थासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तसेच विशिष्ट ब मध्ये संस्थाकडून भाडेतत्वार चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहासाठी मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व अटी याबाबत तरतूद नमूद करण्यात आहे. तरी सिंधुदुर्ग येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे वसतीगृह भाडेतत्वावरिल इमारतीमध्ये सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर इच्छूक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'