आरोग्य विभागाच्या 14 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 14 रुग्णवाहिकांचा लोकार्पण आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग झाले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य नागेंद्र परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पण वेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'