दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 18 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 11.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3514.1075 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 18(3425), सावंतवाडी - 13(3786.1), वेंगुर्ला - 02(2783.8) कुडाळ - 7(3387), मालवण - 11(3785.96), कणकवली - 16(3883), देवगड -12(3075), वैभववाडी - 10(3987) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment