परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी मुदवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) - सन 2019-20 मधील राज्यातील दुष्काळग्रस्त,टंचाईग्रस्त् अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रभावित इ.10 वी व इ.12 वी च्या विद्यार्थ्यीच्या परीक्षा शुल्काच्या प्रतिपूतीसंदर्भात राज्यमंडळाच्या अधिकृत संकेस्थळावरुन ऑनलाईन माहिती मागविण्यात येत असून त्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली आहे.
तरी सर्व मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्चांनी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आधारकार्ड व इतर आवश्यक माहिती विहित वेळेत अचून भरणेबाबत अवगत करुन विनाविलंब कार्यवाही करावी यांची नोंद घ्यावी, अशी माहिती डॉ. शिवलिंग पटवे विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ,रत्नागिरी यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment