सैन्य दलातील अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची गुरुवारी मुलाखत

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार दि. 25 मे रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महारष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 29 मे 2023 ते 7 जून 2023 या कालावधीत एस.एस.बी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी फेसबुक पेज वर Department of sainik Welfare,pune (Dsw) वर सर्च करुन त्यामधील कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एस.एस.बी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (cdse-upsc) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (nda-upsc) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेली असावे. एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफासर केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी , छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी-pctcovic@yahoo.in व दूरध्वनी क्र. 0253 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वीनवर संपर्क करावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'