सहायक संचालकपदी निवड झालेल्या तृप्ती टेमकरचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

सिंधुदुर्गनगरी,दि.26 (जि.मा.का.) : सहायक संचालक वित्त व लेखा वर्ग-1 पदी निवड झालेल्या तृप्ती कृष्णा टेमकर हिचा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कृष्णा टेमकर यांची ती कन्या आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी वडील कृष्णा टेमकर, बंधू अनंत टेमकर, स्थानिक निधी कार्यालयाचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात आदी उपस्थित होते. सोबत :-फोटो 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'