पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरांचे 23 ते 26 मे रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यसाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर" आयोजन महिला व बाल विकास विभार्गामार्फत करण्यात आले आहे. या शिबीरात तालुकास्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील सर्व प्रशासकीय विभाग सहभागी होणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात दि.23 ते 26 मे 2023 या कालावधीत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबीराचे आयोजन केलेले आहे. दि. 23 मे 2023 रोजी कणकवली, येथे मातोश्री मंगल कार्यालय कणकवली सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत व कुडाळ येथे सिध्दीविनायक हॉल कुडाळ रेल्वे स्टेशन रोड सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत. आणि तहसिलदार कार्यालय वेंगुर्ला येथे सकाळी 9 ते सायं 4 वाजेपर्यंत. दि. 24 मे रोजी वैभववाडी तहसलिदार कार्यालय येथे सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत. दि. 25 मे रोजी दोडामार्ग , महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती ऑफिसच्या वर, कसई येथे सकाळी 10 ते सायं 4 वाजेपर्यंत. आणि देवगड, इंद्रप्रस्थ हॉल, डायमंड हॉटेलच्या मागे सकाळी 10 ते सायं. 5 वाजेर्पंत. दि. 26 मे रोजी मालवण , स्वामी समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे सकाळी 8.30 ते सायं 5 वाजेर्पंत. आणि सावंतवाडी , आर.पी.डी.हायस्कूल सावंतवाडी येथे सकाळी 9 ते सायं. 4 वाजेपर्यंत. या शिबीराचे ठिकाणी तात्काळ तक्रार निवारण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या सेवा उपस्थित महिलांना पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालय येथे संपर्क साधावा. दोडामार्ग तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन शासन आपल्या दारी अभियानातंर्गत दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी हॉल दोडामार्ग (पंचायत समिती कार्यालयाच्या वर,कसई) येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दोडामार्ग तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागाकडील शासन निर्णयनुसार राज्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्य अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर हा महिला विशेष कार्यक्रम राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शिबीरातून तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. सर्व विभागाचे प्रमुख या शिबीरास उपस्थित राहून महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे विहित मुदतीत निरसन करणार आहेत. शिबीरामध्ये सर्व शासकीय विभागाचे स्टॉल्स उभारुन सदर स्टॉल्समध्ये संबंधित विभागांच्या योजनांचे बॅनर्स, भित्तीपत्रके, माहितीपुस्तके, घडीपुस्तिका पोस्टर्स इ. असणार आहेत. प्रत्येक स्टॉलमध्ये संबंधित विभगाचे किमान दोन अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून शिबीरामध्ये येणाऱ्या महिलांना संबंधित विभागांच्य योजनांची माहिती देणार आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'