ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका मतदानासाठी भरपगारी सुट्टी
सिंधुदुर्गनगरी दि.17 (जि.मा.का): जिल्ह्यातील सासोली, ता. दोडामार्ग, कोचरा, ता.वेंगुर्ला, आंबोली ता. सावंतवाडी व पडेल ता. देवगड या 4 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका घेण्यात येणार आहेत.त्यासाठी दिनांक 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका नियोजित आहेत. त्याक्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता याव यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवार दिनांक 18 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोट निवडणुकीचा कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगाराना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहिर करीत आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचतीतील सदस्य थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोट निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला असून त्याप्रमाणे या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका नियोजित आहेत.
00000
Comments
Post a Comment